- आहेच ती जगात भारी
गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठवु लागले.अगदी एखाद्या दिग्गज लेखकानं कादंबरी लिहिल्यावर जस वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र उभ राहत ,तसं दिवस आठवले.बारावीत असताना माझ्या वर्गातल्या मुली मला 'MG' म्हणजे महात्मा गांधी म्हणायच्या असं मला माझ्या बहिणीनं सा़गितल कारण तिच्या मैत्रिणीची बहिण माझी क्लासमेट होती.त्याला कारण म्हणजे माझा पेहराव 'बदामी पंचा' आणि 'कोल्हापुरी चप्पल' मला पुर्ण 'स्वदेशी' करून टाकायची.मी रोज शाळेत जायचो आणि 'ती' १००%हजेरी असणारे फारच कमी जण होते त्यात आमचा नंबर येत होती.
'ती' सायकलवरून यायची कारण तीच्या बापाचा अन् आमच्या
तीर्थरूपांचा पेशा एकच मास्तरकीचा त्यामुळं पुढचं सांगायच प्रश्नच नाही.तीचं राहणीमान अगदी साध होतं तोच शाळेचा पंजाबी ड्रेस तिला जाम भारी दिसैयचा,कारण त्याव्यतिरिक्त इतर पोषाखात तिला पाहण्याचा योग मला तरी कधी आला नाही.आमचा पुर्ण वर्ग तीच्यासाठी येडा होता.सगळेजण तिच्या आधी वर्गात येऊन बसायचे.तीनी कधीच वर्गात अशी भलताच येंट्री मारली नाही.नियमितपणा बहुतेक वडिला़च्या शिक्षकीपेशामुळ शिकली असावी.सायकलीवरून येताना तीच्या चेहऱ्यावर कायम स्टोल परिधान केलेला असायचा.नुकतीच ती फॅशन पुण्यावरून शिरूरला आली होती अन् शिरूरच्या संस्कृतीत हळुच शिरकाव केला होता.ती त्याचाच भाग.वर्गात यायच्या आधी ती स्टोल काढुन ठेवत असे . वर्गात आल्यावर अशी चालायची जणु सश्याच काळीज आहे तीच अगदी हुलबावऱ्यागत करायची त्यावरून आमच्या मास्तरनं तीची चांगलीच खेचली होती .वर्गखोलीच्या सुरवातीपासून ५-६ बाकावर ती बसायची ,तीची जागा तशी फिक्स होती पण कधीकधी आमच्या सारख्या पोरांची शाळा घ्यायला मुद्दामुन मागं जाऊन बसायची.तीचा रंग धड गोराही न्हवता अन् काळाही कधी गालावर हाताचा टेकु बसली की हाताची चारही बोटे गालावर अगदी ठळक दिसायची. काही काम नसताना आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटात पेन धरुन त्याच्याशी खेळताखेळता ,ती आपल्या ओठांचा चंबु करून बसल्यावर आमच मन हायसं व्हायच आजच्या स्मार्ट भाषेत त्याला 'पाऊट' असे म्हणतात.थंडीत तीचा रंग अधिकच गुलाबी व्हायचा.ती कधी कधी केसांची खजुरवेणी घालुन यायची मला त्या केशरचनेच नाव माहित न्हवत पण तीच्या मुळ मुद्दामुन विचारून घ्याव लागलं😍
आमचा चिन्या तीला सारखा त्रास द्यायचा तिची वाट अडवायला जायचा पण तीनी कधी त्याच्या विषयी ब्र देखील काढला नाही बहुतेक त्याच्या बलदंड शरिराला घाबरत असावी .बारावी पास झाल्यानंतर तिला परत कधी पाहण्याचा योग आला नाही........ती सध्या काय करते हे देखील माहित नाही.पण तीच नाव आमच्या ओठी सारखं फिरत असत.आजही प्रत्येक सुंदर मुलीची तुलना फक्त तिच्याशीच होते.आम्ही तिला लाडाने गावठी अप्सरा म्हणायचो.मी आजवर तीच्या सारखी सुंदरा पाहिली नाही.समीर साठेच्या भाषेत सांगायच तर होतीच ती 'जगात भारी'
समाप्त
---सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
(कुठलिही तळटीप नाही माझ्या भावनांचा मनमुराद आनंद लुटावा ही विनंती, जय हवा)