दि.२६ जुन !अश्र्विन शु षष्ठी !कुमारषष्ठीचा दिवस! दुपार टळून गेली होती , पावसाची कुठेही आशा न्हवती! साडेतीन पावणेचारची वेळ ! यमदुत आला अन् सुरवातीला तोही कचरला की आता म्हणायचं कसं की "पाटील..चला, मृत्युलोक सोडायची वेळ आलीय" पण शेवटी यमदुतानं हिम्मत केली नि एका युगाचा अंत झाला....त्या युगाची पुर्वपिठिका अशी
आमच्या शिरुर तालुक्यात स्वातंत्र्याच्या मागच्या पुढच्या काळात काही गावच्या पाटील मंडळींचा रूबाब काही खास होता त्यात गणेगाव दुमाला चे पाटील, नागरगावचे पाटील, न्हावऱ्याचे बुआकाका पाटील (शामरावांचे चुलते) आणि या सगळ्या पाटलांच्या आघाडीवर होते आंबळ्याचे जयवंतराव पाटील निंबाळकर!!हे निंबाळकर मुळचे दानोळीचे खर्डेकर निंबाळकर! कोल्हापूर च्या सरलष्करांचे नजिकचे भाऊबंद.
करंजावण्यापासुन निमोण्यापर्यंतचे खटले ज्यांच्या पुढाकारान मिटत होते ते जयवंतराव पाटील यांना उपास-तापास आणि नवसाने झालेलं अपत्य म्हणजे विजयकुमार! त्यांचा जन्म विजयादशमीचा म्हणुन नाव विजयकुमार. हे जग मात्र त्यांना 'बाळपाटील' म्हणुन ओळखतं.चेहरा अगदी वडीलांसारखा , धारदार नाक , साऊथचा हिरो महेशबाबु सारखी परफेक्ट jawline, गोरा नितळ वर्ण, मोठे घारे डोळे शरीर तर इतकं बलदंड की तरूणपणी कोरड्या विहिरीत पडून सुद्धा काही झालं नाही अगदी थोडक्यात 'राजससुकुमार मदनाचा पुतळा' बघताच क्षणी कुणीही माया करावी!
सगळ्याच बाबतीत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं पण दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. जयवंतराव पाटील हे सर्वांना धाकात ठेऊन काम करत पण बाळपाटील सर्वांना आपला माणुस वाटायचा , कुठलंही गाऱ्हाण असं सोडवल की गाऱ्हाण करणार्याला वाटावं आईच्या कोर्टात दावा मांडलाय की काय एव्हढं निव्वळ!धुतल्या तांदळासारख म्हणुन गावानी त्यांना गावची सर्व पद भुषविण्याची संधी दिली.
श्री.विजयकुमार जयवंतराव राजेनिंबाळकर यांची कारकीर्द
•शिवकाळापासुन ते १९६२ पर्यंत गावची मुकादमी निंबाळकर कुटुंबाकडे
•सरपंच ग्रामपंचायत आंबळे १९७८ ते १९८३
•चेअरमन आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबळे
•पोलिस पाटील आंबळे
एव्हढी पद भुषविण्याची संधी मिळाल्यानंतरही लोकांचं त्यांच्याविषयीच प्रेम काकणभर देखील कमी झालं न्हवत ! त्यांनी एखाद्या घरात प्रवेश करणार असं दिसताच, तोच घराचे मालक मालकीण कावरे बावरे व्हायचे मालक वरडून सांगायचा बायकुला "ए चहा ठेव ए चहा ठेव बाळ अण्णा आल्यात बाळ अण्णा!" ती गृहलक्ष्मी देखील कमरंला खोचलेला पदर डोक्यावर घ्यायची लगबगीनं चहा ठेवायची ! या सगळ्या प्रसंगात घरच्या यजमानांचे डोळ्यातील भाव बघण्याजोगे असत!
२०-२५ वर्षापुर्वी असा एक काळ होता की त्यावेळी पैशावर नाही तर शब्दावर निवडणूका लढल्या आणि लढवल्या जायच्या ! त्यावेळी अशी एक समजूत झाली होती की बाळपाटलांनी एखाद्याच्या गळ्यात नुसता हात जरी टाकला तरी समोरच्याला वाटायच "अर्रर्र च च च फुटला गड्या" आता असं ते काय बोलायचे त्यांच त्यांनाच माहिती.
मला लहानपणापासून त्यांच्या बंद्दल आकर्षण वाटायचं जेव्हा मी त्यांना गावची होळी पुजताना पहायचो मला ते माझे आयडॉल वाटत.
त्याच आयुष्य एका सफल जीवनाच मुर्तीमंत उदाहरण आहे कारण ते केवळ तीन अपत्यांचे जनक असले मात्र त्यांनी संपूर्ण गावच पालकत्व आपल्या खांद्यांवर स्विकारल होत
त्यांच जीवन म्हणजे अहोरात्र गावच्या कल्याणासाठी जगणार धगधगत अग्निकुंड होत!बाळपाटील म्हणजे तळपता सुर्य!
बाळपाटील म्हणजे झंझावात! असा झंझावात की ज्याला फक्त मृत्युच शमवू शकला!
अण्णाबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐💐
✍️ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख