सर...देशमुख मला त्रास देतो!!
बारावीचे दिवस होते..... शिरूर,पारनेर,श्रीगोंदा तालुक्याच्या विविध कानाकोपऱ्यातली 'मलई' आमच्या शाळेत भरती होत होती.पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात १ नंबरलाअसणाऱ्या आमच्या शाळेने आमच्या कडुन CET च्या एक्स्ट्रा शिकवणीचे एक्सट्रा पैसे घेतल्यामुळे आम्हाला शिकवणीला जाण भाग पडायच तस शिकवणीला जाण्याच खर कारण वेगळच होतं ते पुढं समजलंच तुम्हाला .बारावीला मला आयुष्यातले खरे मित्र भेटल्याची जाणीव व्हायला लागली होती.अगदी जिवाभावाच नातं तयार होत होतं,मग हळुहळु आमच्याकडे वाडा संस्कृती तयार झाली; रूम मध्ये दरवाजे खिडक्यांना पडदे लाऊन रुम मध्ये अंधार करायचा अन् एका मोबाईल मध्ये पिच्चर लाऊन मोबाईल दरवाजाच्या कडीवर ठेऊन पिच्चरला आनंद घ्यायचा ही सगळी थेरं आम्ही CET ची शिकवणी बुडवुन करायचो कारण नंतर नंतर सगळ्याचा कटाळा यायला लागला होता.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्यामुळ आमच्यात एक वेगळीच झिंग तयार झाली होती.आम्ही जरी CET च्या शिकवणीला गेलो तरी शेवटचा जीवशास्त्राचा तास हमखास बुडवायचो,अन् कुकडी कॉलनीतल्या मैदानावर क्रिकेट खेळायला जायचो ,सुरूवातीला आमच्या आमच्यात सामने व्हायचे नंतर आम्ही ११ वी विरूद्ध १२ वी खेळायला लागलो तेव्हापासुन मला आठवत नाही आम्ही कधी जिंकलो असु कारण ११वीची पोरं खेळायला चिवट होती.
६ वाजले की जीवशास्त्राचा तास सुटायचा हुशार पोरं अन् सगळ्या पोरी घराकडं निघायच्या.त्यात आमच पाखरू बी असायच,आमच म्हणजे निमित्त आमच बाकी आख्खा वर्ग तिच्यावर झुरायचा क्योंकी सबसे दिलकश उसकी अदा थी नाव मात्र माझ बदनाम केलं जायचे.आजही तिच्या सौंदर्याच्या गाथा मुक्तपणे चघळल्या जातात.तीची लाल सायकल होती ती मैदानाच्या थोडी पुढ गेली मागुन पोरं एकच नाव घ्यायची हर्षद.....हर्षद.......हर्षद.......हा पण हे नाव माझ न्हवत ,पणत्याच अन् माझ नाव सारखं असल्यामुळ मला गुदगुल्या व्हायच्या .हे प्रकरण नंतर नंतर जोर धरू लागलं .मग काय व्हायच तेच झालं तिनी जाऊन सरांना सागितल "सर..... देशमुख मला त्रास देतो" दुसऱ्या दिवशी सर वर्गात येऊन म्हणाले देशमुख उभा ऱ्हा !! मग उभा ऱ्हायला आमचा चिन्या सरांनी चिन्याचीच खरडपट्टी घेतली !! तेव्हा मला कळल माझ्या अष्टगंधात किती ताकद आहे💪🏼
©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
(तळटीप :वरील पात्र व घटना कल्पोकल्पित असुन त्याचा फक्त मनोरंजनासाठी वापर करावा त्याचा हेतु फक्त हवा प्रोडक्शन्स प्रस्तुत अष्टगंधाचा महिमा हाच आहे)

Hawa production sadaiv tumchya pathishi ahe..harshad rao.
ReplyDelete. 😂
ReplyDelete👈🏼👚👉🏼
👖