इसवी सन २०२१ च्या आसपास ची ही कथा.ही हर्षदराजे आणि त्यांचा मित्र मंगु धनवटे याची.हर्षदराजे जरी स्वतःला राजे उपाधी लावत असले तरी बाकीचे त्यांना सोन्या , हर्षा अशा नावाने हाक मारत मात्र गावातील वयोवृद्ध त्यांच्या घराण्याच्या आदरापोटी त्यांना सोनबाराजे म्हणत.दस्तुरखुद्द हर्षदराजे ज्यांना मंगु म्हणतात त्यांना सारा गाव मंग्या म्हणायचा अगदी त्याची माऊली सुद्धा! हर्षदराजे आणि मंगु ची जोडी अगदी जयवंत पाटील आणि दतु कोतवालांसारखी हे ही केवळ हर्षदराजेच म्हणत.
तर सगळ्यांचा मंग्या अगदी हर्षदराजे यांचाही तो मंग्याच. सर्वांचा लाडका. ज्यावेळची ही कथा आहे म्हणजे अजमासे ५७-५८ वर्षापुर्वी मंग्या हातासरशी ३-४ तालुक्यातील २०-२५ जणांचा जावई असेल इतका तो प्रेमशास्त्रपारंगत होता.त्यावेळी त्याला आलेली अनेक स्थळ त्यांनी या प्रकरणी धुडकावून लावली होती.असा वीर आमचा मंग्या होता.त्यावेळी एक फॅशन होती इलेक्शन आलं की सणवार मोठे साजरी करायची.त्यामुळ शेजारच्या गावात दहीहंडीच्या निमित्ताने तमाशा होता.आमचं निम्म गाव तिकडं तमाशाला त्यात आम्ही दोघेही आलोच. तमाशा सुरू होणारच होता तेव्हढ्यात त्यांची म्होरकी नर्तकी समोर आली नि म्हणली" आमच्या कॅसिओ वाल्याला चक्कर आलीय.तुमच्यात कुणाला कॅसिओ वाजवता येतो का ?" आमच्या मंग्यानी डायरेक्ट माझा हात धरला नि वर केला. माझी तारांबळ उडाली .मी ऐकत नाही म्हणल्यावर ती खाली येऊन माझ्या दिशेने चालु लागली .मी भवितव्याचा विचार करून गाडीला किक मारुन धुम ठोकली माझ्या जीवानं सुटकेचा निःश्वास सोडला,जणु ती येऊन माझ्या मांडीवरच बसणार होती.
असा त्या मंग्यामुळं माझा बीपी वाढुन मी जिवाला मुकलो असतो.
असेच चांगले मजेत दिवस चालले होते तेव्हढ्यात कोरोना नावाचा विषाणू आला नि साऱ्या जगाला घरात कोंडुन ठेवलं केवळ भारताचा ग्रामीण भाग सोडला तर कारण त्यावेळीसुद्धा काहीअंशी खेडी स्वयंपुर्ण होती.गावातल्या गरजा गावात भागत होत्या.उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं आमचा पव्हायचा बजत ठरला.पण गावात मोजक्याच विहीरींना पाणी होतं कारण चासकमानच पाणी अजुन आलं नव्हतं.ज्या विहीरीवर गेलो तर या विहीरीचा मालक लै चक्सु होता कोरोनाची सगळी पथ्ये पाळायचा.त्यात त्याला सुगावा लागला होता की आपल्या विहीरीत पव्हायला पोरं आल्यात अन् त्यांना सर्दी खोकला पण झालाय. आम्ही पाण्यातच होतो तोच पव्हायला येत नसल्यामुळे आमची कपडे सांभाळणारा मंग्याकुणालख तरी हाक मारत होता पाहीलं तर विहीरीचा मालक होता. जवळ आल्याबरोबर त्यानी दगडी मारायला सुरुवात केली तसा मंग्या बुडाला पाय लाऊन पळाला आमच्या कपड्या सकट. त्या प्रकरणाची बातमी शिळी झाल्यावर आम्हाला कळलं की विहीरीच्या मालकाला व्हाॅट्स अप वर चहाडी करणारा मंग्याच होता.
अशीच एक कहाणी नंतर कधीतरी!
©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.
टीप : जो कुणी ही पोस्ट वाचून देखील लाईक करणार नाही त्याला...............