Tuesday, 5 November 2019

फडणवीस_सरकार:अंगद का पैर


देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.महाराष्ट्राचे गेल्या ४४ वर्षातील सर्वांत वेगळे मुख्यम़त्री हो !!सर्वात वेगळे त्याला कारणही तसच आहे १९७५ साली वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले नि २०१४ पर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने आपल्या कारकिर्दीची सलग ५ वर्ष पुर्ण केली नाहीत.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली नि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आपल्या योग्य निर्णयांमुळे ते महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भाग्यविधाते ठरले.त्यानंतर एक वर्ष पी.के.सावंतांच्या कार्यकाळानंतर वसंतराव नाईकांचा १३ वर्षाच्या काळ महाराष्ट्राच्या शेतीकारणासाठी सुवर्णकाळ ठरला.प्रत्येक गावात एक 'दादा पाटील' असतो त्याप्रमाणे वसंतदादा महाराष्ट्राचे दादा पाटील झाले पण १९७८ साली शरद पवारांच्या 'पुलोद' प्रयोगामुळे कॉंग्रेसच्या पडझडीला सुरूवात झाली,देशात ती १९६७ सालीच सुरू झाली अन् शरद पवार साहेब महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री झाले.ते आजतायगायत महाराष्ट्राचं राजकारण त्यांच नाव घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही.त्यांच्यानंतर १९८० साली त्यांच सरकार बरखास्त झालं अन्१९९५ पर्यंत २-३ वर्षांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री होत राहिले.१९९५ ला पहिल्यांदा कॉंग्रेसविरहित शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं आणि ते पाच वर्ष टिकलं पण मुख्यमंत्री काही पाच वर्ष टिकले नाहीत .या नाहीतर त्या प्रकारे मुख्यमंत्री बदलत राहिले.पण २०१४ साली कॉंग्रेस सरकारच्या कारभारावर झालेली निराशा भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडली नि भारतीय जनता पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदारांसह सरकारची स्थापना झाली.वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देवेंद्रजी राज्याचे दुसरे तरूण मुख्यमंत्री ठरले विशेष म्हणजे त्यांना वसंतराव नाईक,पवारसाहेब,वसंतदादा यांसारखं लोकमत न्हवतं.देवेंद्र फडणवीसांचा जन्म विदर्भातील एका मातब्बर मालगुजार कुटुंबात झाला.त्यांचे वडील जनसंघाचे प्रचारक होते.त्यांचाच वारसा चालवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीला सोबत घेऊन देवेंद्रजींनी राजकारणात प्रवेश केला.१९९२ ला सुरू झालेला प्रवास नगरसेवक,महापौर,आमदार,प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा अनाकलनीय ठरला.२०१४ साली सरकार स्थापन झाल्यानंतर 'हे सरकार टीकणार नाही'अशा वावड्या उठवल्या.दस्तुरखुद्द शरद पवार साहेबही त्यात सामिल होते.पण घडलं वेगळंच ,६ महिन्यांनी पहिले विरोधी पक्षनेतेच फडणवीस सरकार मध्ये मंत्री झाले.हा देवेंद्र फडणवीसांचा पहिला यशस्वी डाव पडला.छगन भुजबळांवर कारवाई करून त्यांनी विरोधकांवर चाप बसवला.फडणवीसांची पाच वर्षे सर्वात धांदलीची पाच वर्षे ठरली.संप,मोर्चे,दंगलींनी फडणवीस साहेबांची कसोटी पाहिली.महाराष्ट्रात देश स्वतंत्र झाल्यापासुन पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा संप केला त्याला त्यांनी हाताळलेल्या सचोटीनं शेतकऱ्यांना खुष केलं.भीमा कोरेगाव दंगलीदरम्यान जनतेने त्यांची निर्णयक्षमता तपासली,राज्याला त्यांच्यातल्या उत्तम प्रशासक असल्याची चुणुक दाखवली.त्यांच्या कार्यकुशलतेपुढे विरोधकांच्या 'हल्लाबोल'सारख्या यात्रा फोल ठरल्या.फडणवीसांच्या काळात कधीही न घडलेला मराठा क्रांती मोर्चा घडला,सारा महाराष्ट्र एका छताखाली एकत्र झाला होता पण तरीही फडणवीसांनी मराठ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लाऊन मराठ्यांना १६% आरक्षण दिलं व विविध योजना मार्गी लावल्या.फडणवीसांना कात्रीत पकडणारे लोकांवरच उलटे डाव पडले.मुख्यमंत्री बदलण्याचे भाषा बोलणाऱ्या लोकांची बोलती बंद झाली.मुख्यमंत्री नाही बदलले पण विरोधी पक्षनेते तिनदा बदलले हे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल.लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भरगोस यश मिळालं.मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा सुरू केल्यानंतर केंद्रसरकारनं  रद्द केलेलं राज्यघटनेतील ३७७ वे कलम हे निवडणुकीत त्यांच्या पथ्यावर पडणार आहे येत्या २ महिन्यात ते धनगर आरक्षणाचा मुद्दामार्गी लावण्याची चिन्हे आहेत.अशा प्रकारे त्यांच सरकार 'अंगद का पैर'ठरलय.त्यामुळं त्यांनी म्हणल्याप्रमाणे ते खरच परत येतील!!!

#हर्षवाणी

#महाजनादेश
#bjpformaharashtra

--सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...