काल महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस होता.त्यामुळं समाज माध्यम दादांच्या छायाचित्रांनी तुडुंब भरलेली आपल्याला दिसली असतील.अजितदादा आपल्या रोखठोक भुमिकेमुळं जनसामान्यांच्यात प्रसिद्ध आहेत.त्यांच्या प्रशासनातील हातखंड्याची विरोधकही कौतुक करतात.८-९ वर्षापुर्वी अजितदादा एकट्याच्या जीवावर १०० आमदार निवडुन आणतात की काय अशी चर्चा होती.तेव्हा स्मार्टफोन एव्हढ्या सहजासहजी उपलब्ध होत न्हवते त्यामुळं समाज माध्यमा़च जाळं आखुडच पडत होतं,त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच कार्यक्रम घेण्यावर अधिक भर असायचा .असाच एक कार्यक्रम 'पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने' घेतला होता,त्याच नाव होतं 'अजित वक्तृत्व अभियान'.ते वर्ष होत इ.स.२०१० त्या वर्षी मी नुकताच ७वीत गेलो होतो.पुणे जिल्ह्यातल्या १३ ग्रामीण तालुक्यात ती स्पर्धा आयोजित केली गेली होती.त्याच नेतृत्व केलं होत महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी आणि शिरूर तालुक्याची जबाबदारी पेलली होती शिरूर तालुका अध्यक्षा वर्षाताई शिवले यांनी.स्पर्धेची सुचना तालुक्यातील प्रत्येक शाळेला पाठवली होती.त्यात आमच्या शाळेचाही समावेश होता.
आमची शाळा म्हणजे 'जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आंबळे'.आमच्या शाळेची स्थापना होती ५ जुन १९०५ ;तालुक्यातल्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक,त्यामुळ फार फार लांब लांबच्या गावांचा आमच्या शाळेशी संबंध होता,अनेक जण आमच्या शाळेतुन मोठे झाले होते.आमच्या शाळेत अजित वक्तृत्व अभियानची सुचना प्राप्त झाल्यानंतर, नेहमी प्रमाणे सरांनी म्हणजे भरत गुरूजींनी माझ्या नावाचा विचार केला आणि मला तयारी करायला सांगितली.मी घरी आल्यानंतर स्पर्धेच्या विषयांचा विचार केला, त्यात एक होता अष्टपैलु नेतृत्व' चटकन अजित पवारांच नाव समोर आलं.दै.लोकमतच्या वाढदिवस विशेष सदरात वैशालीताई नागवडेंनी अजितदादांवर लेख लिहिला होता,तो मी तंतोतंत पाठ केला.माझ्या मम्मीनी मला हावभाव व हातवारे करायला शिकवलं.वैशालीताईंनी लिहिलेला लेख मला तोंडपाठ होता.
बघता बघता स्पर्धेचा दिवस उजाडला होता.मी रोजच्या प्रमाणे पप्पांच्या गाडीवर बसून शाळेत गेलो.शाळेत गेल्यावर भरत गुरुजींनी पुन्हा माझी तयारी घेतली व माझे वर्गशिक्षक वेताळ सरांसोबत मला स्पर्धेच्या ठिकाणी घोडनदीला रवाना केलं.स्पर्धेच ठिकाण होत 'शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर'.मुख्य इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावर संस्थेच सभागृह आहे ,त्या सभागृहात हा कार्यक्रम होता.आम्ही तिथ पोचायच्या आधीच सभागृह गच्च भरलेलं होत.सशाच्या काळजानी मी चाचपडत चाचपडत सभागृहात प्रवेश केला.सभागृहात बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पद भुषवलेल्या व्यक्तींच्या तसबिरी लावल्या होत्या.त्यात सहकारमहर्षी रावसाहेब दादा पवार व रामकृष्णआबा ढमढेरे हे आमच्या नातेसंबंधातले असल्यामुळं ते माझ्या लक्षात राहिले.स्पर्धेला सुरूवात झाली.ज्ञानेश पवार हे प्राथमिक शिक्षक त्या स्पर्धेचे सुत्रसंचालन करत होते.व्यासपीठावर वैशालीताई व वर्षाताईंसह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी होत्या.स्पर्धेत प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयावर आपापली वक्तृत्व सादर करत होता.दुपारनंतर माझा नंबर आला.घाईगरबडीत कसं का होईना मी माझं भाषण संपवलं.माझ्या भाषनानंतर स्पर्धक कमी राहिले होते ,तरीही संध्याकाळ होत आली होती.निकालाची वेळ जवळ येत चालली होती,माझ्या मनात धाकधुक सुरू होती.अजिदादांवर दुसरं कुणी भाषण केलं न्हवतं त्यामुळ माझा नंबर येण्याची संधी होती.अन् झालंही तसच माझा चौथा नंबर आला होता.मी बक्षिस घेण्यासाठी व्यासपीठावर गेलो तसा ज्ञानेश पवार सरांनी उल्लेख केला"पहा जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नंबर येतो".मला त्या वाक्याचा अर्थ उमगला नाही.
मी घरी आल्यावर घरच्यांनी देखील माझं कौतुक केलं पण मला न कळलेल्या वाक्याचा अर्थ सांगितला नाही.पण जसं वय वाढल़ं मी विद्याधामला गेलो तेव्हा कळलं की आपला समाज हा सरकारी शाळांना तुच्छ लेखणारा आहे.त्यामुळं मनात कुठतरी न्युनगंड बळावु लागला होता,पण सातवीत असताना माझी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी केलेली तयारी वाया गेली नाही.गणितात मी विद्याधामच्या पोरांच्याही पुढे होतो.९वीत असताना मला पडणाऱ्या पैकीच्या पैकी मार्कांमुळ शाळेत मला सगळी पोरं ओळखु लागली होती.तसा तसा माझा माझ्या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान वाटु लागला होता.अन् तो अजुनही वाढतोय.पण आजही समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा अंदाच दुखावणारा आहे आणि लोकांची इंग्रजी माध्यमांकडे असणारा कल पाहिला की कींव येते.आणि लक्षात येतं की आजचा समाज ग्लॅमरस जीवनाच्या नादात अधोगतीकडे वाटचाल करतोय.आपल्या जिल्हा परिषद शाळा अजुन कशा प्रगत होतील याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे.
धन्यवाद
----सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडेदेशमुख.
(माजी मुख्यमंत्री,शालेय मंत्रीमंडळ जिल्हा परिषद शाळा आंबळे)
No comments:
Post a Comment