#HAPPY_BIRTHDAY_SAHEB
आपल्या सर्वांना माहित आहे की यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे सातत्य! मी जेव्हा शिरुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तेव्हा त्या सगळ्यात एका व्यक्तीनं आपला वेगळा उमटवल्याच मी पाहिलं ती व्यक्ती म्हणजे आदरणीय लोकनेते बाबुरावजी पाचर्णे.
सन१९५२ पासुन सन २०१९ पर्यंत एकच उमेदवार असा आहे की ज्याने आतापर्यंत विधानसभेच्या ६ निवडणुका लढवल्यात आणि त्यात विजयी किंवा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार ठरलेत.खरतर माझ्या सारख्या आज विशीत असणाऱ्या तरुणांचा जेव्हा जन्म झाला त्याआधी २० वर्ष पाचर्णे साहेबांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. त्यांचा प्रवास सुरू झाला तो तर्डोबाचीवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातुन ! त्यामुळे गरिबी अगदी जवळुन पाहिली.मित्रांबरोबर सायकलवर बसुन शाळेत गेले , दुनियादारी पाहिली.
माझ्या माहितीप्रमाणे ते सरपंच झाले, मार्केट कमिटीचे चेअरमन झाले पण त्यांचं खरं लक्ष्य होतं ते म्हणजे विधानसभा.१९९५ साली अपक्ष उभे राहिले अगदी हातावर मोजण्या इतक्या मतांवरुन पराभव स्विकारावा लागला.टरत १९९७ साली जिल्हा परिषद सदस्य झाले.१९९९ साली पुन्हा विधानसभेला पराभव झाला.पण ते म्हणतात ना "सक्सेस मतलब क्या? Failure के बाद का नया चॅप्टर " असं म्हणण्याची वेळ आली म्हणजे सन २००४ साल उजाडलं .
१९८० साली पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाबुराव दौंडकर यांनी लावलेल भाजपाचे रोपटं कै.संभाजी अण्णा भुजबळांनी मोठं केलं होतं , पाचर्णे साहेबांनी तालुक्यातील जनतेचा भाजप विषयीचं प्रेम ओळखलं आणि त्याच वेळी कै.गोपीनाथराव मुंडे यांच्याशी संपर्क आला आणि २००४ साली पाचर्णे साहेब आमदार झाले. बाबुराव दौंडकर यांनी सुरू केलेंल वर्तुळ हे बाबुराव पाचर्णे यांनी पुर्ण केलं होतं.
या सगळ्यात मला एका गोष्टीचं फार कुतूहल वाटतं शिरुर तालुक्यात असं एक गाव नाही जिथं पाचर्णे साहेबांचा मित्र नाही, हीच गोष्ट त्यांना लोकनेता करते.
राजकीय नेतृत्व म्हणलं की विरोध हा आलाच पण साहेबांचा कुणीही व्यक्तिगत विरोधक नाही ही त्यांची जमेची बाजु आहे.
आज साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांबद्दल लिहू तेव्हढ कमी आहे तरी माझ्या तर्फे
शिरूर तालुक्याच्या लोकनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
©✍ हर्षद रमेश देशमुख
मु.पो.आंबळे ता.शिरुर जि.पुणे.
No comments:
Post a Comment